December 6, 2022

अमिताभ आणि जया बच्चन यांना का करावे लागले २४ तासाच्या आत लग्न ? जाणून घ्या कारण

बॉलीवूडचा शेहनशहा म्हणून अमिताभ बच्चन सर्वांनाच परिचित आहे. ७० आणि ८० च्या दशकात त्याने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. आजही अमिताभ बच्चन माहित नसेल असा व्यक्ती भारतात सापडणार नाही. भारतीय चित्रपट सृष्टीवर राज्य करणाऱ्या या महानायकाने अभिनेत्यांमध्ये सर्वात मानाचे स्थान मिळवले आहे.

चित्रपट सृष्टीबरोबरच अमिताभ बच्चन यांनी राजकारणात देखील नशीब आजमावले होते. कॉंग्रेस पक्षात त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.राजीव गांधी यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.

मात्र बोफोर्स प्रकरणात त्यांचे नाव आल्याने त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र या महानायकाच्या लग्नाचा किस्सा ऐकून तुम्ही हैराण व्हाल आणि आपल्या भारतीय संस्कृतीविषयी तुम्हाला अभिमान देखील वाटेल.

आपल्या चित्रपट क्षेत्रात यशाच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन आणि जया बहादुरी म्हणजेच आजच्या जया बच्चन नात्यात होते. दोघेही पुण्यात एफटीआयआय मध्ये देखील शिकत असताना त्यांची ओळख होती.मात्र सिनेमांमध्ये काम करत असताना दोघांची चांगली मैत्री झाली आणि दोघांनी अभिमान सिनेमाच्या दरम्यान लग्न करण्याचा निर्णय घेतला.

जया बहादुरी या मुळच्या मध्यप्रदेश मधील. त्यांचा जन्म पत्रकार तरुण कुमार बहादुरी यांच्या घरी झाला. त्यांना लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राची आवड होती. ७० च्या दशकापासून त्या चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत अनेक हिंदी आणि बंगाली सिनेमांमध्ये काम केले आहे.

म्हणून करावे लागले २४ तासाच्या आत लग्न

अमिताभ बच्चन आणि जया बहादुरी यांच्या लाग्नामागे देखील एक मोठी रंजक कहाणी असून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि, अमिताभ आणि जया यांना २४ तासाच्या आत लग्न का करावे लागले होते. अमिताभ बच्चन आणि जया बहादुरी यांची पहिली भेट ऋषिकेश मुखर्जी यांनी गुड्डीच्या सेटवर करून दिली.

त्यानंतर दोघांनी एकत्र अनेक सिनेमांत काम केले. त्यानंतर ‘अभिमान’ या सिनेमात काम करत असताना दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ज्यावेळी दोघे जंजीर सिनेमात एकत्र काम करत होते त्यावेळी जर हा चित्रपट हिट झाला तर आपण सर्वांनी लंडनला फिरायला जायचे असा निर्णय त्यांच्या टीमने घेतला.

त्यानंतर अमिताभ यांनी जेव्हा हा निर्णय आपल्या वडिलांना म्हणजे हरिवंशराय बच्चन यांना सांगितला त्यावेळी अमिताभ यांनी जया बहादुरी यांचे देखील नाव सांगितल्यावर त्यांनी विना लग्नाचे बरोबर जाण्यास नाकारले.

त्यानंतर अमिताभ यांनी उद्याच लग्न करण्याचा निर्णय घेतला.आणि सर्व तयारीनंतर दुसऱ्याच दिवशी अमिताभ आणि जया यांचे लग्न झाले आणि त्यानंतर दोघे लंडनला गेले. आणि अशा प्रकारे अमिताभ आणि जया यांचे २४ तासात लग्न पार पडले.