May 30, 2023

या कारणामुळे झाले होते सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप?

भारतीय चित्रपटसृष्टीने असे अनेक चित्रपट निर्माण केले जे वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून आहेत. या चित्रपटांची लोकप्रियता ही त्या चित्रपटाचे कथानक,गाणी,भव्यदिव्य सेट,चित्रपटातील स्टारकास्ट या चित्रपटाशी प्रत्यक्ष निगडीत घटकांवर अवलंबून असते.

त्याचप्रमाणे काही वेळेस ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जुळून आलेल्या चित्रपटातील जोड्यांमधील जवळीकीच्या कथाही तितक्याच सुरसपणे ऐकवल्या जातात. चित्रीकरणादरम्यान जुळून आलेल्या या जोड्या प्रत्यक्ष आयुष्यात नेहमीच यशस्वी ठरतात असे नाही. या जोड्यांच्या ब्रेकअपच्या बातमीनेही चाहत्यांना धक्का बसतो व हे ब्रेकअप होण्यामागच्या कारणांसाठी तर्कवितर्क लावले जातात.

हम दिल दे चुके सनम ह्या संगीतमय तरल प्रेमकथेने आजही रसिकांच्या मनावर गारूड केले आहे. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेले सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये चित्रीकरणादरम्यान प्रेमसंबंध निर्माण झाले होते. ऐश्वर्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सलमानला चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्या चित्रपटातील आपल्या पतीकडे म्हणजे अजय देवगणकड् जाते हे खूप वेदनादायी वाटत होते.

मैने प्यार कियाद्वारे एक चाॅकलेट बाॅय म्हणून बाॅलीवूडमध्ये पदार्पण केलेला व त्यानंतर अनेकविध भूमिकांद्वारे , आपल्या पीळदार शरीरयष्टीद्वारे तरूणींना घायाळ करणारा द मोस्ट एलिजिबल बॅचलर आणि बुद्धी आणि सौंदर्याते परफेक्ट काॅम्बिनेशन असलेली ऐश्वर्या ही अगदी मेड फाॅर इच अदर जोडी असल्याचे मानले जाऊ लागले.

चित्रीकरण संपल्यानंतरही सार्वजनिक आयुष्यात हे दोघे एकत्र वावरत होते. ते विवाह करणार असल्याचेही प्रसारमाध्यमांद्वारे सांगितले जात होते. सलमानमुळे ऐश्वर्याचे तिच्या कुटुंबियांशीसुद्धा वाद होत. अशा सर्व परिस्थितीमध्ये अचानक सलमान व ऐश्वर्या यांच्यातील प्रेमसंबंध संपुष्टात आल्याच्या बातम्या येऊन धडकल्या. त्यांच्या चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का होता.

परफेक्ट मॅच मानल्या गेलेल्या या कपलचे ब्रेकअप होण्यामागच् नक्की कारण आजही स्पष्ट झाले नाही.त्यानंतर या दोघांचेही मार्ग वेगळे झाले. ऐश्वर्याने बीग बी अनिताभ बच्चन यांचा पुत्र व अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. आता ती आराध्या या गोंडस मूलीची आई आहे.

सलमान व ऐश्वर्याचे नाते तुटण्यामध्ये सलमानचे ऐश्वर्याप्रतीचे आतातायी प्रेम हेप्रमुख कारण असल्याचे मानले जाते.
सलमान व ऐश्वर्या जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. या कालावधीमध्ये ऐश्वर्या सलमानच्या सर्व कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित असे व तिचे सलमानच्या कुटुंबियांशी खूप आपुलकीचे संबंध निर्माण झाले होते. मात्र ऐश्वर्याच्या आईवडिलांना हे संबंध अजिबात मान्य नव्हते व त्यांनी ते कधी लपवून ठेवले नाही.

सलमान ऐश्वर्याकडून लग्नाचे वचन मागत होता नाहीतर आत्महत्या करण्याची धमकी देत होता असेही निरटवर्तीय सांगतात. ऐश्वर्याला मात्र लग्नाचा निर्णय घेण्याची घाई नव्हती. सलमान ऐश्वर्याला प्रेमाच्या नावाखाली आपले म्हणणे ऐकून घेण्यासाठी मारहाण करत असें ऐश्वर्याच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्यातही सलमान ढवळाढवळ करत असे. चलते चलते चित्रपटाच्या सेटवर सलमानने ऐश्वर्याला मारहाण केल्यानंतर तिच्याा तिच्या भूमिकेसाठी राणी मुखर्जीची वर्णी लागली.

सलमानसोबत ब्रेक अप झााल्यानंतर ऐश्वर्याने सलमान आपल्या पालकसोबत आदराने वागत नसले्याचे सांगितले व हे सलमानने पण कबूल केले. सलमान ऐश्वर्यावर अन्य कोस्टारच्या बाबत संशय घेऊन शिवीगाळ करत असे. २००१ साली ऐश्वर्याने स्वत: व आपल्या कुटुंबियाच्या हित व स्वाभिमानाला जपण्यासाठी सलमानसोबत काम करणार नसल्याचे जाहीर केले. सलमानसोबतचे नाते हे एक दु:स्वप्न होते व ते संपुष्टात आले हेच बरे झाले असेही तिने सांगितले होते.