May 30, 2023

दाऊद सोबतच्या अनिल कपूरच्या फोटोवर सोनमने दिले स्पष्टीकरण , नेटकऱ्यांनी दाऊदच्या पार्टीचा व्हिडीओ शेअर करून केला प्रतिप्रश्न , पहा व्हिडीओ

आपल्या फॅशन सेन्स साठी ओळखली जाणारी सोनम कपूर अहुजा सोशल मीडियावर देखील तेव्हडीच ऍक्टिव्ह असते . आता नवीन एका पोस्ट मुळे सोनम पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान ट्रॉल होते आहे . चला तर मग पाहुयात नक्की काय घडले आहे ते …

तर मग घडले असे कि , सोनम ने दिल्ली मधील शाहिनबागमध्ये झालेल्या फायरिंग बाबत दुःख व्यक्त केले होते . परंतु नेटकऱ्यांना तिचे हे दुःख काही खास रुचले नाही . नेटकऱ्यांनी तिच्या या पोस्ट वरून तिला जुन्या एका फोटो वरून ट्रोल करायला सुरुवात केली . हा फोटो होता सोनमचे वडील आणि बॉलीवूडचे प्रख्यात अभिनेता अनिल कपूर यांचा …

तर झाले असे कि या फोटो मध्ये अनिल कपूर यांच्या सह कुख्यात गुंड दाऊद देखील दिसत आहे . यावर जेव्हा नेटकरी आणि काही पत्रकारांनी तिला विचारणा केली तर त्यावर तिने स्पष्टीकरण देताना सांगितले कि , ” अनिल कपूर हे भारतीय क्रिकेट संघाचा सामना पाहण्यासाठी राज कपूर आणि कृष्णा कपूर यांच्या सह तिथे गेले होते . दुसऱ्यावर बोट उचलण्यापूर्वी आधी त्यातील तीन बोटे आपल्याकडे असतात हे लक्षात घ्यावे . तुम्ही जी अहिंसा पसरवत आहात त्याबद्दल परमेश्वर आपल्याला माफ करो ” . अशी प्रतिक्रिया सोनमने या ट्रॉलरन्स ना दिली आहे .

परंतु ट्रोलर्स एवढ्यावरच थांबले त्यांनी , सोनमाच्या या स्पष्टीकरणावर एका नेटकाऱ्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे . या व्हिडीओ मध्ये बॉलिवूडचे अनेक दिग्गज दिसून येत आहेत . दाऊद इब्राहिमच्या भाच्याचा वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या पार्टी मध्ये अनिल कपूर डान्स करताना स्पष्ट दिसत आहे . या व्हिडिओवर मात्र सोनमने कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिली नाहीये .