कोणत्या देशातील स्त्रिया सर्वाधिक सुंदर असतात हा प्रश्नच खरंतर अनेक प्रश्नांना निर्माण करतो . कारण सुंदरतेची परिभाषा नक्की काय ? हा प्रत्येकाचा वयक्तिक विचार असतो . पुरुषाचं नाही तर स्वतः स्त्रियांचे देखील स्वतःचे असे मापदंड असू शकतात . काहींच्या मते लांब सडक काळेभोर केस हे सुंदरतेचे एक प्रतीक आहे . पण दुसरीकडे आज मुलीही लहान केस ठेवतात आणि रंग तर अगदी कोणताही केला जातो . हिरवे , गुलाबी आणि लाल केस तर आजकाल सामान्य झाले आहेत . तसेच कपड्यांच्या प्रकारांची तर गिनती करणे अवघड आहे .
चष्मा असेल तर आधी लेन्स वापरले जायचे , आता रंगीत लेन्स अगदी सामान्य झाले आहेत . आधी गोंदले जायचे आता टॅटू काहीजणांच्या संपूर्ण शरीरावर दिसतात . दागिन्यांचे नवीन-जुने प्रकार , सौन्दर्य प्रसाधने हे सौन्दर्यात भर घालण्यासाठी स्वतःचे रूप देखील बदलत असतात .
आता सौन्दर्याच्या सर्वात महत्वाच्या पैलूंकडे पाहुयात ते म्हणजे रंग , उंची आणि शरीरयष्टी … खरेतर हे तीनही निसर्गतः आणि अनुवायूंशिकतेने येणारे नैसर्गिक सौन्दर्य आहे . परंतु याच पैलूंचे अधिक समीकरण हे या सुंदरतेचा परिभाषेत गुंतवले जाते . मग जे निसर्गतः गोरे असतात ते काहींना सुंदर वाटत , जे उंच असतात हे काहींना सुंदर वाटतात तर ज्यांची शरीरयष्टी सूडॊल असते ते लोक काही जणांना सुंदर वाटतात . तुम्हीही कदाचित सौन्दर्य याच समीकरणात बसवायचा प्रयत्न करत असाल . पण का हीच खरी सौन्दर्याची परिभाषा असते ?
परंतु खरे सौन्दर्य हे आणखी काही पैलूंना नक्कीच जपून ठेवते . ज्याचा जास्त विचार केला जात नाही आणि वेळ आणि बाहेरील सौन्दर्य देणारा तोच निसर्ग त्या सोंदार्याचे खरे रूप समोर आणतो . मानव जाती मध्ये काळा , सावळा आणि गोरा हे तीनच रंग आहेत . हे रंग जर निसर्गाने दिले आहेत तर त्याची सुंदरता आपण ठरवणारे कोण ? उंची हि कमी असो किंवा जास्त ती सौन्दर्याचा मापदंड कशी असू शकते ? आणि शाररिक सुडॊलता हि अनुवांशिक आणि परिस्थितीवर अवलंबून असते .
रस्त्याने जाताना एखाद्या जाडजूड मुलिची हेटाळणी करण्यापूर्वी हि गोष्ट लक्षात घ्या कि , प्रत्यक्ष मुलाची आई हि जन्म देताना वजन वाढवतेच एव्हाना निसर्गचं गर्भाच्या रक्षणासाठी आणि योग्य वाढीसाठी आईचे वजन वाढवते असे म्हणायला हरकत नाही . मग जन्मानंतर आणि अगदी स्वतःच्या अंतापर्यंत आपण आपल्या आईला तिच्या सौन्दर्याविषयी बोलतो का ? तर नाही … स्त्रीच्या शरीरात जन्मा पासून अगदी मेनोपॉस पर्यंत मोठे बदल होत असतात . आणि उरलेले आयुष्य झालेल्या बदलांचे परिणाम भोगत असते . त्यामुळे जसे घरातील स्त्रियांच्या सौन्दर्यासाठी कोणतेही मापदंड नसतात तसेच कोणत्याही देशातील ठराविक स्त्रियांसाठी सौन्दर्याचे मापदंड नसतातच .
निसर्गाने प्रत्येक स्त्रीला दिलेलं जननी हेच रूप खरे सुंदर आहे . स्त्रीच्या बाह्य सौन्दर्यापेक्षा तिचे आई , बहीण , पत्नी , मुलगी , मैत्रीण हेच रूप सुंदर आहे . कारण त्या रूपातील प्रत्येक स्त्री हि आपल्याला सुंदरच वाटते .