ब्रम्हा ,विष्णू आणि महेश हे त्रिदेव संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीचे मुळ आहे असे निरनिराळ्या सिद्धांताद्वारे आतापर्यंत मांडण्यात आले आहे.या त्रिदेवांच्या संपूर्ण विश्वाच्या निर्मिती करण्यासाठी घेतलेल्या निराळ्या अवतारांबद्दल आपल्याला पुराणांमध्ये वाचायला मिळते. ब्रह्मा-विष्णू-महेश हे आपल्या प्रत्येक अवतारामध्ये विश्वाच्या निर्मितीशी निगडित काही मूल्य समाजामध्ये रुजवताना दिसतात व त्या अवताराच्या शेवटाला नवीन मूल्यांची नांदी सुरू झाल्याचे आढळते. या त्रिदेवांमध्ये ब्रह्मा हे खऱ्या अर्थाने निर्माते मानले जातात व या जगामध्ये कोणत्याही जीवाची निर्मिती झाली नव्हती तेव्हा ब्रम्हा हे एकटेच संपूर्ण अवकाशामध्ये अस्तित्वात होते.
ब्रह्मदेवाची सहचारिणी देवी सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते व ब्रह्मदेवाला देवादी देव प्रजापती मानले जाते.ब्रम्हदेव हे मुळात सरस्वतीचे पिता होते व त्यांनी आपलीच कन्या सरस्वती सोबत विवाह केला असे पुराणकथांमध्ये आपल्याला वाचायला मिळते. सरस्वती पुराण,मत्स्यपुराण यामध्ये यासंदर्भातील नोंदी आढळून येतात. संपूर्ण विश्वाचे पिता असलेल्या ब्रह्मदेवाने आपल्याच कन्येसोबत विवाह का केला हे आज आपण जाणून घेणार आहोत.
जेव्हा संपूर्ण विश्वामध्ये कोणत्याही जीवाची निर्मिती झाली नव्हती तेव्हा ब्रह्मदेव या विश्वामध्ये एकटेच अस्तित्वात होते . चराचरामध्ये सजीव सृष्टीची निर्मिती करण्यासाठी त्यांनी आपल्या अतिउच्च शक्ती मधून एका स्त्रीची निर्मिती केली या स्त्रीचे नाव होते देवी सरस्वती. सरस्वतीला निर्माण केल्या क्षणी तिचे अप्रतिम सौंदर्य व व्यक्तिमत्व पाहून ब्रह्मदेवाला जणू आकर्षण निर्माण झाले व त्याने देवी सरस्वती सोबत विवाह करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला .
आपल्या पित्याकडून आपल्या प्रति निर्माण झालेले हे आकर्षण पाहून देवी सरस्वती ने भगवान शिवाकडे या धर्म संकटातून वाचवण्या साठी प्रार्थना केली.त्यावेळी ब्रह्मदेवाने पृथ्वीच्या निर्मितीसाठी ब्रह्मदेव व सरस्वतीचे मिलन होणे अत्यंत आवश्यक आहे ते सांगितले. म्हणूनच ब्रह्मदेवाने आपल्याच मुली सोबत विवाह करणे हे कोणत्याही प्रकारचे पातक नसल्याचेही समजावून दिले. नंतर ब्रम्हदेव व सरस्वती समुद्रातील एका ठिकाणी मनुच्या निर्मितीपर्यंत एकत्र वास्तव्यास होते.
ब्रह्मदेवाने आपलीच मुलगी देवी सरस्वतीच्या सोबत विवाह करणे हे अन्य देवांकडून पातक मानले गेले होते. देवी सरस्वतीची निर्मिती केली तेव्हा तिच्या सौंदर्याने आकर्षित होऊन ब्रह्मदेवाने तिला पाहण्यासाठी ती जाईल त्या दिशेने आपले डोके वळवले होते. त्यावेळी भगवान ब्रह्मदेवाला पाच डोकी होती. मात्र भगवान ब्रह्मदेवाच्या आपल्याच पुत्री बद्दलच्या आकर्षणामुळे क्रोधित होऊन महादेवांनी ब्रह्मदेवाचे पाचवे शिर धडावेगळे केले. त्यामुळे ब्रह्मदेवाची फक्त चारच शिरं अस्तित्वात आहेत.
भगवान ब्रम्हदेवाने पृथ्वीच्या निर्मितीचे कारण सांगून देवी सरस्वतीला आपल्याशी विवाह करण्यास लावले असले तरीही त्यावेळी देवी सरस्वतीने ब्रह्मदेवाला असा शाप दिला की संपूर्ण विश्वाचा निर्माता असूनही पृथ्वीतलावर ब्रह्म देवाचे पूजन केले जाणार नाही. ज्या प्राणी पशु ,मनुष्य यांची निर्मिती ब्रह्मदेवाकडून केली जाईल तेच त्याची पूजा करणार नाहीत.
देवी सरस्वतीला सावित्री, गायत्री, ब्राह्मणी अशा निरनिराळ्या नावांनी ओळखले जाते. देवी सरस्वती ही विद्येची देवता व देवनागरी लिपीची निर्माती आहे अशा नोंदी आपल्याला पुराणकथांमध्ये आढळतात.