March 16, 2023

सावधान! धूम्रपान केल्याने होतात ‘हे’ गंभीर आजार

धूम्रपान करताय ? सावधान !!

१. फुफ्फुसांचे  नुकसान : वातावरणातील प्रदूषण , अमली पदार्थ , वेगवेगळे धूर यांच्यातील अनेक रसायने श्वासावाटे फुफ्फुसापर्यंत पोहोचतात ज्यांचा एक थर  तिथे तयार होतो. आणि X Ray काढल्यास तुम्हाला पांढऱ्या धुरा प्रमाणे फुफ्फुसांभोवती धूर दिसून येतो . हा धूर , फुफ्फुसांच्या cancer ला कारणीभूत ठरतो . हा धोका पुरूषांमध्ये २५% तर महिलांमध्ये २५. ७% आढळतो. त्याचबरोबर  chronic obstructive pulmonary disorder  , chronic bronchitis इत्यादी रोगांनाही बळी  पडण्याची शक्यता धूम्रपानाने बळावते.

२. हृदयरोग : धुम्रपानामुळे हृदय , रक्त वाहिन्या आणि रक्त कोशिका यांनी नुकसान पोहोचतं  . सिगरेट मध्ये आढळणारं रसायन आणि टार , रक्त वाहिन्यांना ब्लॉक करतं आणि हृदयाच्या गतीला अवरोध निर्माण करतं  . एव्हढंच नाही तर हे प्रमाण वाढत राहिल्यास हात आणि पायांच्या रक्तपुरवठ्याला सुद्धा अडथळा निर्माण होतो ज्याला ” peripheral  artery disease ” म्हणतात . हा रोग बळावल्यास ब्लड clotting , हृदयात pain आणि सर्वात शेवटी हृदयविकाराचा झटका यात परिणती होते.

३. प्रजननदोष : सिगरेट मधील रसायने महिलांच्या अंतर्स्रावी ग्रंथींवर वाईट परिणाम करतात . ज्यामुळे प्रजननासाठी आवश्यक हार्मोन्स कमी स्त्रवू लागतात आणि गर्भधारणेत अडथळे निर्माण होतात. हाच प्रभाव पुरूषांमध्ये देखील दिसून येतो . त्यांना स्तंभन दोष उत्पन्न होतो आणि वीर्यातील शुक्राणूंची गुणवत्ता देखील खालावते .

४. गर्भावस्थेतील धोका : सिगरेट पिण्याची सवय असतानादेखील गर्भ-धारणा झाल्यास धोके अजून वाढतात . गर्भ , गर्भाशयात धारण होण्याऐवजी , गर्भाशयाला जोडणाऱ्या नलिकांमध्ये वाढू लागतो ज्याचं पर्यवसान माता अथवा गर्भाला धोका उत्पन्न होण्यात होतं .  सुदैवाने मूल गर्भाशयात वाढू लागल्यास वजनाने कमी भरतं , वेळे आधी डिलिव्हरी होते आणि काही वेळेस अर्भकाचा टाळू आणि ओठ फाटलेले दिसतात. एवढंच नाही तर मेंदू, फुफ्फुसं आणि मध्यवर्ती मज्जा संस्थेला देखील इजा पोहचू शकते .

५. type २ डायाबिटीस चा धोका : आजकालच्या बदल्त्या जीवनशैलीमुळे बहुतांशी लोकांना type २ डायबिटीस होताना दिसतो. हा डायाबिटीस मुख्यत्वेकरून लवकर ओळखू येत नाही कारण नॉर्मल डायाबिटीस मध्ये अचानकपणे  वजन कमी होऊ लागतं पण यात तसं काहीच होताना दिसत नाही . आणि हा आजार होण्याचा धोका धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये ३०/४०%वाढतो आणि त्या नंतरच्या अडचणी देखील !

६. कमजोर रोगप्रतिकारक शक्ती : वाढतं  धूम्रपान तुमच्या रोग-प्रतिकार शक्ती कमी करतं  आणि त्याचबरोबर शरीरात सुजेचे प्रमाण देखील वाढतं .

७. डोळ्यांचे आजार : धुम्रपानामुळे वयाआधीच मोती-बिंदू आणि तत्सम धोके वाढतात . ग्लुकोमा , डोळे सतत कोरडे राहणं आणि मधुमेहामुळे निर्माण होणारी रेटिनापथी इत्यादी आजार बळावतात.

८. मुख-विकार  : धूम्रपान केल्याने हिरड्यांच्या तक्रारी वाढतात , त्यांच्यात सूज आणि pain  आढळून येतं . दात हलके होतात , ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त वाहतं . दात अति संवेदनशील होतात आणि पिवळे पडतात. आणि महत्वाची गोष्ट ही त्या व्यक्तीची चव आणि वासाची क्षमता देखील धूम्रपानाने affected होते.

९. त्वचा , केस आणि कॅन्सर : अति धूम्रपानामुळे  केस झडतात , त्वचेवर लवकर सुरकुत्या पडतात आणि ओठा जवळील त्वचेला कॅन्सर चा धोका उत्पन्न होतो .एवढंच नाही तर तुमच्या त्वचेला आणि केसांना तंबाखूची दुर्गंधी येऊ लागते. त्याचबरोबर पोटाचा कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर , आमाशयाचा कॅन्सर इत्यादी आजाराचे धोके सिगरेट आणि तंबाखू  मुळे २०-३० % वाढतात .

तेव्हा जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर जरा सांभाळून ..