May 30, 2023

जाणून घ्या स्त्रियांना न आवडणा-या 9 गोष्टी, ८ गोस्ट जी तुमच्या कडून ही चुकून घडली असेल ?

स्त्रीह्रद्य जाणून घेणे हे कोणत्याही पुरूषासाठी नेहमीच आव्हान राहिले आहे.पूर्वीच्या काळी स्त्रीला भुरळ घालण्यासाठी आकाशीतून चंद्र-तारे तोडून आणण्याच्या आणाभाका घेतल्या जात. आधुनिक काळात स्त्री पुरूषांच्या बरोबरीने निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये वावरत आहे.अशावेळी स्रीची स्वत:ची मत निर्माण झाली आहेत.बाहेरच्या जगात वावरताना स्त्रियांना नक्की कोणत्या गोष्टींचा तिटकारा वाटतो हे काही नोकरदार स्त्रियांकडून जाणून घेतले. स्त्रियांना नक्की कोणत्या गोष्टी आवडत नाहीत हे जाणून घेणे नक्कीच उत्कंठावर्धक आहे.

१.सध्याच्या युगातील आत्मविश्वासाने परिपूर्ण स्त्रीला पुरूषांनी प्रत्यक्ष नजरेला नजर भिडवून संभाषण केलेले जास्त आवडते. संभाषणाच्या दरम्यान स्त्रीच्या शरीरावरून नजर न हटविणा-या पुरूषांचे वर्तन स्त्रियांना खटकते.

2. चांगला लुक नसताना फोटोमध्ये टॅग केलेले आवडत नाही.

३.प्रत्येक स्त्रीमध्ये थोड्या प्रमाणात का होईना स्त्रीसुलभ असुया असते म्हणूनच आपल्या मित्र , पतीने दुस-या स्त्रीलोबत बोलणे त्यांना थोडे खटकते.

४.स्वत:चे कपडे, दिसणे याबाबत जागरुक असलेल्या स्त्रियांना जेव्हा या सर्व गोष्टींचा साधा उल्लेखही केला जात नाही तेव्हा निश्चितच राग येतो.

५.आपला मित्र किंवा पतीने दुस-या स्त्रीसोबत तुलना केली तर असुरक्षित वाटते.

६.स्त्रियांना विशेषत: टापटीपपणाची आवड असते त्यामुळे घर अस्ताव्यस्त ठेवणारे पुरूष अजिबात आवडत नाहीत.

७.केलेल्या चुकीची माफी न मागणारे पुरूष स्त्रियांच्या गुडबुकमध्ये नसतात.

8.गर्दीचा फायदा उठवत जाणूनबुजून पुरूषांनी केलेला नकोसा स्पर्श स्त्रियांसाठी सर्वात तिरस्कारपूर्ण असतो.

९.चारचौंघांमध्ये कमी लेखलेले कोणत्याही स्त्रीस खपत नाही.