May 30, 2023

भूत-प्रेत खरंच अस्तित्वात आहेत का? काय आहे विज्ञानाचे या विषयी मत

माहिती तंत्रज्ञान व विज्ञानाच्या या आधुनिक युगामध्ये कोणत्याही अंधश्रद्धेला वाव नाही. तथ्यांच्या आधारावर जी धारणा सिद्ध होऊ शकते तिलाच खरे मानता येऊ शकते. मात्र अशा परिस्थितीतही काही रहस्य व आपल्या ज्ञानाच्या पलीकडे असलेल्या अज्ञात गोष्टींना आपण अनुभवतो. मात्र त्या नक्की कशा घडतात हे मात्र सांगता येणे आपल्याला जमत नाही.

कारण त्याला पुष्टी देणारे कोणतेच पुरावे आपल्याजवळ नसतात.अशाच काही अज्ञात गुढ गोष्टींपैकी वर्षानुवर्षे रंगून सांगितल्या जाणाऱ्या भूता प्रेतांच्या गोष्टी आज या आधुनिक काळातही तितकाच उत्सुकतेचा भयाचा व कुतूहलाचा विषय आहे. भूत प्रेत असे काही या जगात नसते असे विज्ञान मानते त्यामुळे भुताखेतांवर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहे असे मानले जाते.

मात्र तरीही आज सुद्धा समाज मनावर भूतप्रेत यांचा इतका प्रचंड पगडा आहे की भुताखेतांच्या नावाखाली कोणीही अगदी सहजपणे त्यांना गंडा घालू शकते. भुता प्रेतांना केंद्रस्थानी ठेवून अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट ही आपल्या हिंदी चित्रपट सृष्टी आणि आणि हॉलीवूड मध्ये सुद्धा निर्माण केले गेले आहेत व त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड असा प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे. यावरूनच भूताप्रेतांनाजाणून घेण्याविषयी चे समाज मनाचे कुतुहुल लक्षात येऊ शकते.

मात्र खरोखरीच सध्या आधुनिक काळामध्ये अनेकदा आपल्याला भुता प्रेतांची काहीतरी अनुभूती झाली आहे असे अगदी सुशिक्षित अंधश्रद्धांना न मानणारे लोक सुद्धा सांगतात.मात्र त्यांना ते सर्व अनुभव सांगण्यासाठी कोणताही पुरावा मिळू शकत नाही. अशाच काही घटना आज आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये भूतप्रेत यांना आधुनिक युगामध्ये अनुभवण्याचे अगदी ठासून सांगण्यात आले आहे.

जही संपूर्ण जगभर भूत प्रेत अस्तित्वात असतात या मताचा एक गट सक्रिय आहे. जाँन कचुबा यांनी लिहिलेल्या घोस्ट हंटर या पुस्तकांमध्ये तर त्यांनी भूतप्रेत अर्थातच एक अज्ञात ऊर्जा आपल्या आजुबाजूला सदैव कार्यरत असते हे पटवून देण्यासाठी साक्षात अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या सिद्धांताचा आधार घेतला आहे.

या पुस्तकामध्ये असे नमूद केले आहे की आईन्स्टाईनच्या मते कोणतीही ऊर्जा आहे तशी  नष्ट केली जाऊ शकत नाही ती सदैव कुठल्या ना कुठल्या माध्यमांद्वारे कार्यरत राहते. म्हणजेच मनुष्य देहातील जी उर्जा आहे ती मनुष्याच्या मृत्यूनंतरही नष्ट होत नाही तर ती त्यानंतर कुठल्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूला वावरत असते व यालाच भूत प्रेत किंवा आत्मा असे म्हटले जाते.

सध्या घोस्ट हंटर ही एक कम्युनिटी अस्तित्वात आली आहे जी भूत प्रेत यांच्या अस्तित्वाचा शोध घेण्यास उत्सुक असते .बऱ्याचदा हे घोस्ट हंटर कम्युनिटीमधील सदस्य हे हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात म्हणजेच अत्याधुनिक मायक्रोफोन, कॅमेरा, मॅग्नेटिक डिटेक्टर, इत्यादी मात्र यामधूनही कधी कधी काही ध्वनिलहरी किंवा उर्जा लहरी शिवाय फारसे पुरावेगोळा करता येणे शक्य झालेले नाही.