पैसा वाचवून वाढवावा कसा ?
शिर्षकावरून मला माझ्या लहानपणी शाळेत घडलेली गोष्ट आठवली . शाळेत सर सांगत होते ” पैश्याला पैसा खेचतो !”. त्याचा मी शब्दशः अर्थ घेतला आणि गेलो बँकेत —
काही लोकं पैसे भरण्यासाठी तर काही पैसे काढण्यासाठी अशी मोठठी रांग लावून उभी होती . कॅशियर त्याच्या केबिन मध्ये नोटांची मोठठी गड्डी मोजत होता त्याच्या केबिनला ग्रिल होते आणि तेथे जाळे लागले होते , ते काढतो आहे असं दाखवत मी केबिनच्या अवतीभोवती फिरू लागलो . मग हातात १० ची नोट घेतली आणि ती लांबीत दुमडून गजातून अशी आत सरकवू लागलो जेणेकरून या नोटेला पाहून कॅशियरच्या हातातील नोटा माझ्या नोटेला चिकटतील. पण तसं न होता माझीच नोट कॅशियरच्या हातातील नोटांमध्ये जाऊन पडली आणि त्याने मला हुसकावून लावलं .
दुसऱ्या दिवशी, उदास आणि दुःखी कष्टी चेहऱ्यानी ही गोष्ट मी सरांना सांगताच , ते हसायला लागले. आणि म्हणाले ” पैश्याला , पैसे खेचतो म्हणजे , पहिल्यापासूनच उत्पन्नातील काही भाग वाचवला , गुंतवला कि हळू हळू पैसे गाठीला जमून वाढीस लागतो . “. लहानपणची ती गोष्ट आणि त्याचं स्पष्टीकरण इतकं माझ्या मनात पक्कं बसलंय की ” उत्पन्नाचा काही भाग गुंतवण्यासाठी मी नेहमी चांगल्या आणि खात्रीलायक योजनांच्या शोधात असतो .
चला पाहूया तर या योजना कुठल्या-
१) नोकरी किंवा छोट्या side बिझिनेस मधील पैसा घरात कधीही नकद स्वरूपात ठेवू नका , तर आपल्या बँकखात्यात ठेवा .
२)PPF अर्थात पब्लिक प्रोव्हिडंड फंड मध्ये दरमहा पैसे जमा करायला विसरू नकाम्हणजेच कारण यावर मिळणारे व्याज करमुक्त असते.
३)घरात ज्या व्यक्ती कमावत्या असतील , त्यांनी टर्म (ठराविक कालावधीचा ) विमा जरूर करावा .
४)विमा हा तुमच्या पश्च्यात तुमच्या आपल्या लोकांना आर्थिक दृष्टया मजबूत ठेवण्यासाठी असतो त्यामुळे त्याला बचतीचे एक साधन मानू नये . म्हणजेच विम्याचे प्रीमियम आणि saving चे हफ्ते यांना वेगवेगळं ठेवावं .
५)आजकालच्या काळात आपण आणि आपल्या घरातील लोकं यांच्या आजारपणात अधिकाधिक खर्च होतो तो टाळायचा असेल तर मोठ्यांनी ४०शीच्या आत लहान मुले डिपेन्डन्ट म्हणून असा मेडिकल इन्शुरन्स जरूर करावा . त्यात दिरंगाई करू नये.
६)share मार्केट ची पुरेशी माहिती नसल्यास shares ऐवजी mutual फंड मध्ये गुंतवणूक करावी , त्यातही दरमहा ठराविक रक्कम (SIP ) करावी जेणेकरून तोट्याची शक्यता खूप कमी होते कारण चढ्या-उतरत्या सर्व भावात फंड खरेदी होते .
७)नोकरी करणाऱ्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा अटल पेन्शन योजना मध्ये गुंतवणूक करावी यात जास्तीतजास्त १५००० कर आपण वाचवू शकतो . कर भरलेला असला तरी वरील गुंतवणूक दाखविल्यावर कापलेले पैसे परत मिळतात .
७)बचत करताना , स्वतःला Hindu undivided family म्हणून जाहीर केला तर , कमीतकमी अडीच लाख रुपये इतकी करात सूट मिळते आणि गुंतवणुकीचं स्वातंत्र्य देखील मिळतं .
मग आता वाट कसली पाहताय ? नुकतंच बजेट जाहीर झालंय आणि नवीन financial इयर पण होतंय सुरु , तेव्हा लागा कामाला !!!!
हि माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य नक्की शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद . #beingmaharashtrian