अथांग ,असीम ,गहिरा, व्यापक अशा निरनिराळ्या उपमांनी संबोधले गेलेले ठिकाण म्हणजेच विस्तृत पसरलेला ,दोन। ध्रुवांना एक करणारा असा समुद्र होय.या समुद्रामध्ये कोणाला आपल्या दोन ध्रुवावर असलेल्या दोन प्रेमिकांना एकत्र करणारी वीण सापडते तर कोणाला या अथांग, खोल डोहामध्ये जीवनाचे सत्य जाणवते. आयुष्याचे असे निरनिराळे रंग एकत्र घेऊन मनुष्याला विविध पैलू दर्शवणाऱ्या समुद्रामध्ये कवी कल्पनांच्या पलीकडे सुद्धा अनेक रहस्य दडलेली आहेत यांपैकी काही रहस्य ही समोर आली आहेत. मात्र ही रहस्य नक्की काय आहेत हे उकलणे आज सुद्धा शक्य झालेले नाही जगभराला लाभलेल्या समुद्र क्षेत्रांमध्ये ही निरनिराळी रहस्य विखुरलेली आहेत.पृथ्वीतलावर एकूण क्षेत्रापैकी दोन तृतीयांश क्षेत्र समुद्राने व्यापलेले आहे. समुद्राच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ पाच टक्के क्षेत्राबद्दल संशोधकांना परिपूर्ण असे ज्ञान प्राप्त झाले आहे बाकी 95 टक्के माहिती म्हणजे अद्यापही एक रहस्य म्हणूनच पाहिले जाते .समुद्राचे किनारे आणि समुद्र तळामध्ये अनेक अशी रहस्य दडलेली आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला वर्तमानामध्येसुद्धा चक्रावून सोडले आहे. आज आपण अशाच काही रहस्यांविषयी जाणून घेणार आहोत जी समुद्राशी निगडित आहेतः
1) दक्षिण फिलिपाईन्सच्या समुद्र किनार्यावर एक नाव सापडली होती व या नावे मध्ये एक ममी होते .हे ममी जर्मन नाविक मैनफ्रेड फ्रिट्ज बेजोराटौ ची होती. ममी म्हणजे प्रेताला जतन करुन ठेवण्याचा अतिप्राचीन असा प्रकार होय. या सापडलेल्या ममी वर अभ्यास केला असता असे जाणवले की ही ममी केवळ सात दिवस अगोदर बनवण्यात आलेली आहे. म्हणजे केवळ सात दिवसांच्या अवधीमध्ये या प्रेता पासून ममी बनवण्यात आली होती हे एक न उलगडलेले कोडे आहे कारण ममीला बनवण्यासाठी महिनोन् महिन्यांचा कालावधी लागतो. या ठिकाणी केवळ सात दिवसांमध्ये अगदी जिवंत वाटत असावे अशी ममी तयार करण्यात आली होती व या ममीला कोणी तयार केली होती व त्या ठिकाणी कशी आली हे अद्यापही समजले नाही.
2) जापान मध्ये योनागुनी तटावर काही असे भग्न अवशेष सापडले आहेत यावरून असे अंदाज वर्तवले जातात की या ठिकाणी प्राचीन काळामध्ये एखादी नागरी संस्कृती अस्तित्वात होती मात्र ती कोणती नागरी संस्कृती होती याचा अद्याप शोध लागलेला नाही. या नागरी संस्कृतीच्या अस्तित्वाबद्दल तज्ञांची मते ही भिन्न भिन्न आहेत. तसेच काही तज्ञांच्या मते या ठिकाणी सापडलेले अवशेष समुद्रतळ आणि समुद्राच्या काठावरील संरचना तयार झाल्यामुळे कालपरत्वे तयार होतात.तर काही तज्ञांच्या मते या ठिकाणी एक विकसित अशी नागरी संस्कृती अस्तित्वात होती मात्र कालपपरत्वे समुद्रामध्ये बुडून गेली.
3) जपानच्या दक्षिणेस समुद्रामध्ये काही गोलाकार आकृती पहावयास आजही मिळतात. या गोलाकार आकृती सर्वात प्रथम जपानच्या दक्षिण समुद्रामध्ये 1995 साली दिसल्या होत्या व काही तज्ञांच्या मते या ठिकाणी यावेळी परग्रहावरील जीव आले होते व या परग्रहावरील जीवांना आणणारी तबकडी म्हणजेच त्या गोलाकारआकृती होत. मात्र काही तज्ञांच्या मते या आकृती समुद्रातील मेल पफर जातीच्या माशां कडून बनवल्या जातात व यांचे साधर्म्य हे परग्रहावरील प्राण्यांशी मिळतेजुळती असते.मेल पफर जातीच्या माशांकडून अशा आकृती या फिमेल पफर ला आकर्षित करण्यासाठी केल्या जातात.मात्र या दाव्याला सुद्धा पुष्टी देणारे सत्य अजूनही समोर आलेले नाही त्यामुळे आजही या समुद्रामध्ये परग्रहावरील जीव येतात असेच मानले जाते.
4) काही समुद्री तटांवर अत्यंत अनाकलनीय व भयभीत करणारे प्रकार सुद्धा घडले आहेत असाच एक रहस्यमय प्रकार कॅनडामधील ब्रिटिश कोलंबियाच्या सैलेश समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळतो. सैलेश समुद्रकिनाऱ्यावर मनुष्यांचे पाय व पंजे सापडून येतात. आत्तापर्यंत अशा प्रकारचे जवळपास 16 पायांचे पंजे सापडले आहे यापैकी काही पंज्यांना बूट सुद्धा घातलेले असतात हे पायांचे पंजे नक्की कुठून वाहत समुद्रकिनाऱ्यावर येतात हे अद्यापही न उलगडलेले कोडे आहेत.
5) समुद्र सफरी यांची निगडित कथा कहाण्यांमध्ये आपण समुद्री दैत्यांची वर्णने ऐकली आहेत .समुद्री दैत्यही अतिशय अगडबंब शरीरयष्टी असलेले, अक्राळविक्राळ रूप असलेले, भेसूर, समुद्राच्या सफरीवर निघालेल्या प्रवाशांची हत्या करत असत अशी एकंदरीत वर्णने असतात. मात्र प्रत्यक्षात सुद्धा असे समुद्री दैत्य समुद्राच्या खोल डोहामध्ये वास्तव्य करून आहेत असे काही लोकांचे म्हणणे आहे व काही लोकांनी समुद्राच्या तळाशी त्यांना प्रत्यक्ष पाहिल्याचे सुद्धा वर्णन केले आहे मात्र खरोखरच असे अनुभव आलेल्या व्यक्तींना दिसणाऱ्या व्यक्ती या समुद्री दैत्य होत्या का हे न उलगडलेले कोडे आहे.
6) बाल्टिक समुद्राच्या काठावर शास्त्रज्ञांनी एक अंतराळ यान सापडल्याचा दावा केला गेला. 2011साली हे अंतराळ यान बाल्टिक समुद्राच्या तटावर सापडले मात्र हे अंतराळ यान पृथ्वीवर बनवल्या गेलेल्या अंतराळ यानांशी मिळतेजुळते नसून त्याच्याशी साधर्म्य दाखवणारी प्रतिकृती आहे. या प्रतिकृतीच्या जवळपास पोहोचल्यावर नाविकांच्या नावां वरील सर्व उपकरणे ही बंद पडतात त्यामुळे लोकांचा व नाविक यांचा असा दावा आहे की या प्रतिकृतीमध्ये जादूने भारलेल्या शक्ती आहेत तर काही जणांच्या मते ही प्रतिकृती म्हणजे परग्रहावरील प्राण्यांचे विमान असून ते अपघात घडल्यामुळे समुद्रामध्ये कोसळले आहे.
7) क्युबाच्या समुद्रामध्ये 2001 साली संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये समुद्राच्या अगदी खोल तळाशी मानवजातीच्या अस्तित्वात असलेले शहराचे अवशेष सापडले यावरून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की खुप शतके आधी क्युबाच्या समुद्रतळाशी एक नागरी संस्कृती सर्व सोयीसुविधा असलेले शहर वसलेले होते. मात्र हे शहर नक्की कोणते होते व याच्या अस्तित्वाचा शोध ह्या शहराची हालचाल जोपर्यंत चालू होती तोपर्यंत का लागू शकला नाही, या शहरांमध्ये कोणत्या प्रकारचे जीव वास्तव्य करत होते याबद्दल अद्यापही कोणतीही माहिती मिळालेली नाही.
8) ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी समुद्रातील 19 फूट लांबी असलेल्या शार्कवर संशोधन सुरू केले होते मात्र काही कालावधीनंतर अगदी अचानकपणे या शार्कचे अर्धे कापले गेलेले गेलेले शरीर समुद्रावर तरंगत किनार्यावर येऊन पोहोचले .इतक्या जास्त लांबीच्या अवाढव्य शार्कला समुद्रातील कोणता जीव खाऊ शकतो याचे अनुमान काढणे या संशोधकांना शक्य झाले नाही. या शार्क ला नक्की कोणी खाल्ले यावर दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत.त्यापैकी एक म्हणजे या शार्क पेक्षाही जास्त लांबी असलेल्या व मोठ्या शार्कने कदाचित 19 फूट लांबीच्या शार्क ला अर्धे खाऊन टाकले असेल किंवा समुद्राच्या खोलात वास्तव्य केलेल्या समुद्री दैत्याने या शार्कला खाऊन टाकले असेल मात्र अजूनही कोणतेही ठाम असे मत या शार्कच्या मृत्यू मागे संशोधक बनवू शकलेले नाहीत.
9) अथांग व गहिऱ्या अशा समुद्राने अनेक अनकलनीय रहस्य आपल्या या पोटामध्ये जणूकाही दडवून ठेवले आहेत व ही रहस्य सांगण्यासाठी कित्येकदा या रहस्यांशी निगडित व्यक्ती सुद्धा अस्तित्वात राहत नाही. त्या सुद्धा या समुद्राच्या अंतरंगामध्ये मिसळून जातात अशीच घटना 1872 साली अटलांटिक सागर मध्ये मेरी सेलेस्टे नामक जहाज अगदी हृदय पिळवटून टाकणाऱ्या अवस्थेमध्ये सापडले.या इतक्या महाकाय अशा जहाजामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणीही क्रू मेंबर किंवा प्रवासी सापडले नाहीत तसेच अशा भग्न अवस्थेमध्ये सापडलेल्या या जहाजामध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे मृतदेह किंवा अवशेष सुद्धा सापडले नाहीत.यावर काही व्यक्तींचा असा दावा आहे की हे काम एखाद्या गुढ शक्तीचे असावे जिने या जहाजावरील प्रवाशांचा असा करुण अंत केला आहे किंवा समुद्रातील दैत्य किंवा तत्सम समुद्री जीवांचे हे काम असावे असे सुद्धा काहीजण सांगतात. काही व्यक्तींच्या मते समुद्रातील भूकंपासारख्या घटनांच्या वेळी या जहाजावरील व्यक्तींनी समुद्रामध्ये उड्या टाकून आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला असेल ज्यामुळे या जहाजावर एका सुद्धा व्यक्तीचे अस्तित्व सापडले नाही.
10) संपूर्ण जगभरातील अनेक युद्धांचा सुद्धा समुद्र हा साक्षी आहे .2002 साली जावा समुद्रातील एका बोटीमध्ये तीन डच युद्ध सैनिकांचे मृतदेह सापडले या मृतदेहाचे रहस्य हे होते की हे तीनही युद्ध सैनिक दुसऱ्या विश्व युद्ध मध्ये मारले गेलेले सैनिक होते.