अखिल ब्रह्मांडाच्या भोवती निरनिराळे ग्रह भ्रमण करत असतात व या ग्रहांना आपल्या हिंदू धर्मामध्ये निरनिराळ्या स्वभाव व वृत्तींच्या देवता मानण्यात आले आहे. प्रत्येक ग्रह हा भिन्न स्वभावाचा असतो. शनि अर्थातच भगवान शनिदेव किंवा सूर्यपुत्र शनिदेव यांना संपूर्ण ब्रह्मांडातील देवतांमध्ये सर्वात जास्त क्रोध व कोप पावणारे भगवान मानले जाते.
श्री शनिदेवांना सर्वात जास्त क्रोधीत होण्यामागचे कारण म्हणजे ते न्यायाची देवता मानले जातात. अगदी तटस्थ राहून न्यायदानाचे काम करताना योग्य व सच्च्या कार्याचे फल देणे आणि चुकीच्या कामासाठी शिक्षा करणे हे कार्य श्री शनिदेव पार पाडत असतात. म्हणूनच जेव्हा कोणी काही चुकीचे काम करतो तेव्हा ते अत्यंत कोप पावतात व संबंधित व्यक्तीला त्याच्या कर्माची शिक्षा देतात.
भगवान शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार योग्य ते फळ देत असतात .ज्याप्रमाणे चुकीच्या कामासाठी शनिदेव दंड करतात अगदी त्याप्रमाणे चांगल्या कामासाठी ते व्यक्तीला सुख, सौख्य ,धनशक्ती सुद्धा प्रदान करतात. भगवान शनिदेवांच्या कोपाला सर्वात कठीण असा काळ आज सुद्धा मानले जाते. भगवान शनिदेवांचा क्रोध यापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनि दोष निवारण करण्यासाठी नक्की काय करावे ह्याबद्दल निरनिराळ्या ग्रंथांमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
शनी दोष म्हणजे म्हणजे साडेसाती होय.हा काळ साधारण अडीच वर्षांचा असतो. असे म्हटले जाते की शनिदेवांना त्यांच्या पत्नीने दिलेल्या शापामुळे हळूवार गतीने फेरा पूर्ण करण्यात अडीच वर्षे लागतात. शनिदेव हे न्यायप्रिय देव आहेत व ते दंडाधिकारी सुद्धा आहेत त्यामुळे त्यांना निष्पक्षपणे कोणत्याही व्यक्तीला त्याच्या चांगल्या व वाईट कर्माची चांगली फळे किंवा शिक्षा देणे अभिप्रेत आहे त्यामुळे त्यांची प्रतिमा क्रोधी अशी भक्तांमध्ये अशी बनली आहे. मात्र त्यांच्या पत्नीच्या शापामुळे भगवान शनिदेवांना कोणत्याही राशीला पार करण्यासाठी अडीच वर्षे लागतात.
शनि दोष निवारणासाठी शनी दोषाच्या काळामध्ये शनी जाप मंत्रा चा उच्चारण करण्याचा सल्ला दिला जातो .शनि मंत्र जपाच्या उच्चारणा मुळे शनी दोषा च्या काळातील कष्टापासून, दुःखापासून काहीसे मुक्ती मिळवण्याची प्रार्थना केली जाऊ शकते.
प्राचीन पुराणांमध्ये असे सांगितले जाते की भगवान हनुमान जी ने लंका दहनाच्या वेळी शनी आणि अन्य नवग्रहांचा मुक्ती मिळवून दिले होते त्यामुळे भगवान शनी देवांची भगवान हनुमान यांच्या प्रती प्रचंड भक्ती आहे म्हणूनच भगवान हनुमान यांच्या भक्तांना श्री शनिदेव कधीही दुःख किंवा कष्ट देत नाही म्हणूनच शनिदोषाच्या काळामध्ये शनी देवांचे आराध्य असलेल्या श्री हनुमान आणि श्री महादेव यांची पूजा केली तर शनि दोष निवारण केले जाऊ शकते.
शनी दोष निवारणासाठी शक्यतो शनिवारी मोहरीचे तेल अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरू नये किंवा केसांना सुद्धा लावू नये. शनिवार हा शनिदेवांचा वार असल्यामुळे या दिवशी काळी उडदाची डाळ, मोहरीचे तेल दान करावे.
शनिवारी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावे यामुळे साडेसाती दूर होते असे सांगितले जाते.शनिदोष निवारणासाठी नेहमी कावळ्याला धान्याचे दाणे टाकावे.
शनिवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला चपाती खायला द्यावी तसेच काळ्या रंगाच्या गाईला सुद्धा तूप लावलेली चपाती खायला दिल्यामुळे शनि दोष निवारण होऊ शकते असे पूर्वजांनी सांगितले आहे.
शनिवारी हनुमान चालीसा आणि सुंदर कांडचे पठण अवश्य करावे. लाकडाच्या कोळशाला शनी निवारण दोषासाठी पाण्यामध्ये अर्पण करावे.
शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी वाहावे व मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा कारण पिंपळाच्या झाडा मध्ये सर्व देवांचा वास असतो असे म्हटले जाते. शनी देवाच्या साडेसाती पासून वाचण्यासाठी घरामध्ये कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा अनादर होता कामा नये.