March 15, 2023

मृत्यू झाल्यानंतर तेराव्याचा विधी का केला जातो? ? जाणून घ्या त्यामागील कारण..

प्रत्येक जीव हा नश्वर आहे हेच चिरंतन आणि शाश्वत सत्य प्रत्येक धर्मामध्ये मानले जाते .जन्माला आलेला प्रत्येक  जीव हा अंतिमतः मृत्यूच्या मार्गावर मार्गक्रमण करतो असे निरनिराळ्या तत्वज्ञानाच्या शाखांमध्ये ही सांगितले गेले आहे. व्यक्तीच्या मृत्यूशी निगडित काही प्रथा या पूर्वापार अगदी जशाच्या तशा पाळल्या जात आहेत. घरातील वडीलधारी मंडळी व्यक्ती मृत पावली की त्याचे निरनिराळे विधी पार पाडतात जेणेकरून त्या व्यक्तीचा पुढचा प्रवास हा सुकर होईल .कारण हिंदू धर्म व अन्य धर्मांमध्ये ही व्यक्ती मृत झाल्या नंतर सुद्धा पुढील प्रवासाला सुरुवात करते.अशाच काही प्रथा व परंपरा ज्या व्यक्ती मृत झाल्यानंतर हिंदू धर्मामध्ये पाळल्या जातात त्यांच्या बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

हिंदू धर्मामध्ये मृत शरीराला अग्नी हा सूर्यास्तापूर्वी देण्याची प्रथा आहे. सनातन धर्मामध्ये साधू किंवा योगी यांना समाधी देण्याची प्रथा आहे तर सामान्य व्यक्तींना अग्नि देण्याची प्रथा आहे .साधू किंवा योग्यांना समाधी दिली जाते कारण आयुष्यभर साधना करून त्यांच्यामध्ये जी एक प्रकारची सात्विक ऊर्जा निर्माण झाली असते तिला नैसर्गिक पणे प्रसारित होऊ देण्याचा हा त्यामागचा उद्देश असतो. तर सामान्य व्यक्तींना अग्नी दिला जातो जेणेकरून त्यांच्यामध्ये अजूनही भौतिक आसक्ती शिल्लक असेल तर तिचे दहन होते आणि दुसरे कारण म्हणजे कोणत्याही प्रकारचा जंतूंचा संसर्ग असेल तर तो अग्नीद्वारे नाहीसा होतो.

गरुड पुराणा मध्ये मृत शरीराचे अंतिम संस्कार व अन्य विधी वैदिक पद्धतीने व रीतीनुसार केले तरच त्या शरीराच्या आत्म्याला शांती मिळते व नव्या शरीरामध्ये प्रवेश करण्याचे द्वार खुले होतात किंवा मुक्ती मिळते.

अंतिम संस्कारांमध्ये जवळच्या व्यक्तींनी सहभागी होणे हे पुण्याचे काम असते असे वैदिक साहित्य मध्ये लिहिले गेले आहे। अंतिम संस्कार मध्ये सामील होऊन  प्रेताला खांदा देणेही पुण्याचे कार्य मानले जाते. अंतिम संस्कार मध्ये सामील झाल्यानंतर आयुष्याचा चिरंतन सत्य हे मृत्यूचआहे याची प्रत्यक्ष जाणीव होते त्यामुळे अंतिम संस्कार मध्ये सहभागी झाले पाहिजे असे सांगितले जाते.

मृत शरीराला अग्नी देण्यापूर्वी त्या पार्थिवा भोवती खांद्यावर घागर घेऊन परिक्रमा केली जाते व शेवटी त्या घागरीला छिद्र पाडले जाते यामागचे कारण असे आहे की आपले आयुष्य हे जणू काही या घागरी प्रमाणेच असते व त्यातील पाण्याप्रमाणे आपले आयुष्य हे कमी कमी होत जाते शेवटी घागर फोडून पाणी सांडले जाते तेव्हा या आयुष्याची सर्व आसक्ती इथेच सोडून पुढच्या नवीन जन्माला परिक्रमा करायचे आहे असा यामागचा अर्थ होतो.

प्रेताला अग्नी दिल्यानंतर जी रक्षा व अस्थी मागे राहतात त्यांना एखाद्या पवित्र जलस्रोतांमध्ये वाहून दिले जाते.  पार्थिव शरीराच्या अंतिम संस्कारानंतर 13 दिवसापर्यंत निरनिराळे विधी केले जातात हे सर्व विधी पार पाडले तर आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते अन्यथा तो आत्मा भटकत राहतो अशी धारणा आहे म्हणूनच अंत्यसंस्कारानंतर दहावा व तेरावा असे दिवसांचे विधि शास्त्रोक्‍त पद्धतीने पार पाडले जातात.

दहाव्या दिवशी मृत व्यक्तीच्या आप्तजन मधील पुरुष मुंडण करतात. दहाव्या दिवशी मुंडन करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे त्या व्यक्तीचा प्रती सन्मान व आदर प्रकट करणे व या वातावरणामध्ये जर कुठल्या जंतू वगैरे संक्रमण असेल तर तेसुद्धा मुंडणा द्वारे निघून जाऊ शकते.

तेराव्या दिवशी  मृत व्यक्तीच्या नावाने भोजन दिले जाते. या सर्व विधी मागचे विश्लेषण गरुडपुराण मध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर च्या प्रवासाच्या स्वरुपात करण्यात आले आहे साधारण मृत्यू नंतर साधारण तीन दिवसांपर्यंत व्यक्तीमधील चेतना ही वातावरणामध्ये जागृत असते असे गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे त्यामुळे तेराव्या दिवशी दुस-या जन्माच्या मार्गाने परिक्रमण करते. मृत व्यक्तीच्या आप्तस्वकीय यांनी या पृथ्वीतलावर केलेले विधी व पिंडदान यामुळे मृतात्म्याला पुढील जन्म घेण्यासाठी किंवा मुक्ती मिळवण्यासाठी साहाय्य मिळते म्हणून तेराव्या दिवशी महाभोजन देऊन विधी करण्यास महत्त्व दिले जाते.