May 29, 2023

मुलींना आवडतात ‘या’ 9 गोष्टी असणारे मुले …

‘अगर आपको लडकी को पटाना है तो हमारा बाॅडी स्प्रे युझ करे ‘ अशा मुलगी पटवण्याचे कानमंत्र देणा-या जाहिराती आपण नेहमीच पाहत असतो. एखाद्या चित्रपटामध्ये गुंडांपासून हिरोईनची सुटका करण्यासाठी हिरो धुवांधार फाईट करताना दिसतो. कवीहृद्याचा एखादा शायर आपल्याला आवडणा-या मूलीसाठी शायरी लिहितो. काल्पनिक आयुष्यात या सर्व प्रयत्नांचा शेवट हा नेहमीच सुखद असतो मात्र प्रत्यक्ष आयुष्यात मुलगी पटवणे हे बॅाडी स्प्रे फवारण्याइतके साधेसरळ नक्कीच नसते. तुम्हांला आवडणारी मुलगी पटवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा सुपरमॅन न बनता काही छोट्याछोट्या गोष्टी अंमलात आणणेही प्रभावी ठरू शकते.

१.मुलीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी फिल्मी फंड्यांचा वापर करणे कटाक्षाने टाळावे.मूलीला बघून गाणे म्हणणे किंवा द्व्यर्थी बोलून तिच्यासमोर नकारात्मक प्रतिमा निर्माण होण्यास साहाय्य करण्यासारखे आहे.

२.दिवसरात्र त्या मूलीच्या प्रेमात वेडे होऊन अन्य काही कामातून अंग काढून घेण्यापेक्षा आपल्या करिअर, अन्य छंदांवर लक्ष केंद्रित करा कारण मूलींना ध्येय निश्चित असलेली मूलं आवडतात.

३. संबंधित मूलीला आपण आवडावे म्हणून सदानकदा तिच्या कामांना पूर्ण करण्यामध्ये आपल्या वेळेचा अपव्यय करू नये.

४. संबंधित मूलीला आपली मालकी न समजता तिला एक व्यक्ती म्हणून आदराची वागणूक द्या.तिच्या भावनांचा सन्मान करा.कोणत्याही व्यक्तीला आदर ही सुखावून टाकणारी भावना असते. तुमच्या आदराने वागण्यामुळे ती मुलगी तुमच्यामध्ये निश्चितच रस घेईल.

५.केवळ आपल्याला ती मूलगी किती आवडते हे ठासून सांगण्यापेक्षा तिच्या. आवडीच्या विषयांवर संवाद साधावा. केवळ आपणच बोलत राहण्यापेक्षा त्या मूलीचे म्हणणेही ऐकावे.तिच्या आवडीनिवडी,छंद यातून कळू शकतात.

६. चांगले सामाजिक भान, उत्तम विनोदबुद्धी , अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेली मूलं मुलींना जास्त आवडतात.ही कैाशल्ये विकसित करण्यावर भर द्यावा.

७.आवडत्या मूलीला कायम ती विशेष असल्याची जाणीव करून देत राहा.हाॅटेलमध्ये गेल्यावर बिल भरणे, गिफ्टस देणे यासारख्या गोष्टी केल्या जाऊ शकतात.

८. मूलींना प्रेझेंटेबल राहणारी मूलं जास्त आवडतात त्यामुळे टापटीप राहण्यावर भर द्यावा.

९.प्रेमात पडताना कधीही केवळ कपडे, वागणे-बोलणे यापलीकडच्या वास्तवाची नेहमी जाणीव करिअरच्या माध्यमातून ठेवावी कारण कोणतीही मुलगी वेल सेटल्ड मुलालाच पहिली पसंती देते.