May 30, 2023

पेट्रोल टाकताना १०० नाही तर ११० रुपयांचं पेट्रोल का टाकतात ?

काय , चमत्कारिक वाटतंय न  ऐकून ? पण हेच खरंय ! तुमच्या बाबतीत कधी असं  झालंय की तुम्ही ८ दिवसांपूर्वी तुमच्या नेहमीच्या नाही तर एक वेगळ्या पंपावरून  पेट्रोल भरलं आणि ते चक्क १ दिवस जास्त चाललं . आणि तेव्हा तुमच्या लक्षात आलं की मी नेहमी ज्या पेट्रोलपंपावरून  पेट्रोल टाकते तिथून टाकलं की पेट्रोल लगेच संपतंय .पण असं  होऊ शकतं  आणि ते तुम्हाला कळावं म्हणून हा लेख !

तुम्ही जर ” राऊंड figure ” मध्ये अर्थात १०० ,२००  अश्या अमाऊंटचं पेट्रोल भरत असाल तर होऊ शकतं की तुम्हाला कमी पेट्रोल दिलं  जातंय . पण मग तुम्हाला असं वाटेल की अश्या मारलेल्या पेट्रोल मधून पंपमालक किती नफा कमवेल ? चला आता आधी ते पाहू या ..

उदाहरणार्थ :

एक पेट्रोल पंपावर रोज ५००० लिटर पेट्रोल विकलं जातं  . म्हणजे पेट्रोल ७० रुपये लिटर असेल तर ३,५०,००० रुपये पंप  मालकाकडे जमा होतात . परंतु प्रति लिटर तो ४० ml  इतकं पेट्रोल मारतोय , म्हणजे ५००० मधलं  त्याने ५०००*४०%१०००= २०० लिटर पेट्रोल त्याने मारलंय . पेट्रोल चा दर  ७०/- पकडला तर २००*७०=१४०००/- इतका काळा  पैसे तो कमावतोय .

म्हणजे १४०००*३०= ४,२०,००० इतके पैसे तो बेकायदेशीर रित्या आपल्या हक्काचं  पेट्रोल लुबाडून कमवतोय . याच्याच जवळपास तो डिझेल मध्ये देखील कमावत असेल .म्हणजेच वर वर छोटा वाटणारा हा गोरखधंदा प्रत्यक्षात खूप मोठ्ठा आहे . पण हे पेट्रोल ते कसं  लांबवत असतील , आधी आता ते पाहू या .

शक्यता  १: पेट्रोल पंपाचा , प्रत्येक पंप  , पेट्रोल quantity आणि त्याचं एकूण अमाऊंट हे काढण्यासाठी programmed  असतो . पण पंप चालक कुठल्या जाणकार व्यक्तीला बोलावून या प्रोग्रॅम ला बदलवू शकतो , म्हणजेच तुम्ही १लिटर पेट्रोल सांगितलं  तर १० ml pipeline मध्ये कमी येईल किंवा १०० चं सांगितलं तर तुम्हाला १००चं पेट्रोल टाकलेलं दिसेल पण प्रत्यक्षात ९५ रुपयेचं  टाकलेलं असेल . पण हा फेरफार केवळ जाणकारच करू शकतो .

शक्यता २:  तुम्ही पेट्रोल भरताना निरीक्षण करा , तुम्ही केवळ ५०/- पेट्रोल टाका सांगितलंय  आणि पंपावरील मुलगा पाईप आपल्या गाडीच्या टॅंक मध्ये सोडून इकडेतिकडे पाहतोय , तुम्हाला भीती वाटतेय की  जास्त टाकलं गेलं तर ? कारण तुमच्याकडे ५०च रुपये आहेत . पण रिडींग मधील आकडा ५०/- वर पोहोचताच ‘खट्ट ‘ , आवाज होऊन , पेट्रोल येणं थांबतं . हे असं  का होतं ? बरोबर ! पाईपमधील सेन्सर मुळे! पण त्यात मालकाने गडबडी केली तर मात्र तुम्ही मागताय त्याच्या १०/२० ml कमी  तुम्हाला मिळू शकतं .

शक्यता ३: दोन पेट्रोल पंपामधील पेट्रोलची घनता वेगवेगळी असू शकते. कदाचित ज्या पेट्रोल पंपावर तुम्ही नेहमी पेट्रोल भरता  तेथील पेट्रोलची घनता जास्त असू शकेल.

शक्यता ४ : या शक्यतेचं  प्रमाण जास्त आहे आणि त्याचं  कारण पंपावरील कामगाराची हातचलाखी ! पेट्रोल भरताना तो पाईप ला असलेला खटका सतत खाली वर करत असेल तर दाट  शक्यता आहे की तुम्हाला कमी पेट्रोल दिलं जातंय . पुढच्या वेळेस तो असं करताना दिसल्यास त्याला नक्की थांबवा . कारण हा खटका किंवा नोझल हे प्रत्येक वेळेस अमाऊंट किंवा quantity  फीड केल्यावर केवळ एकदा चालू किंवा बंद करण्यासाठी calibrate केलेलं असतं .

तेव्हा तेव्हा ” ग्राहक राजा जागा हो , कारण दिलेल्या पैश्याइतकं  पेट्रोल/डिझेल मिळणं हा तुझा अधिकार आहे आणि तो तू मिळवलेच पाहिजे !”