May 28, 2023

एकच रक्तगट असलेल्या स्त्री-पुरुषांनी लग्न करावे का जाणून घेऊया

एकच रक्तगट असलेल्या स्त्री-पुरुषांनी लग्न करावे का

लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असे फार पूर्वीपासून म्हटले जाते. लग्न जुळवताना कुंडली शास्त्र ,संस्कृती ,राहणीमान या घटकांबरोबरच सध्या आरोग्यविषयक घटकांचाही विचार केला जातो .आरोग्यविषयक घटकांमध्ये बऱ्याचदा समान रक्तगट असलेल्या  स्त्री-पुरुषांनी परस्परांशी लग्न करावे की नाही व त्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर होऊ शकतो का हा एक प्रश्न नेहमीच विचारला जातो.

बऱ्याचदा भारतीय कुंडली शास्त्रांमध्ये ही नाडी शास्त्र तपासले जाते. आजच्या काळामध्ये मुलगा व मुलगी लग्न जमवण्या पूर्वी आपले रक्तगट तपासून घेत असल्याचे दिसून येते. रक्तगट एक असल्यावर नक्की काय परिणाम होऊ शकतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

एक असल्यावर नक्की काय परिणाम होऊ शकतात

एकच रक्तगट असेल तर वैवाहिक आयुष्यावर व लैंगिक आयुष्यावर कोणताही प्रत्यक्ष प्रभाव पडत नसल्याचे आरोग्य निष्कर्ष समोर आले आहेत.

एकच रक्तगट असलेल्या स्त्री-पुरुषांनी विवाह केला व मुलं होऊ देण्याच्या वेळी प्रजनन क्षमतेवर काही दाम्पत्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याचे निदर्शनास आले आहे मात्र काहींना अशा कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झालेली नाही असेही आरोग्य संशोधनामधून स्पष्ट झालेले आहे.त्यामुळे एकच रक्तगट असलेल्या स्त्री-पुरुषांना जेव्हा ते बायोलॉजिकल पेरेंट्स असतात तेव्हा खरोखरच प्रजनन क्षमतेवर काही परिणाम होतो की नाही हे वादातीत आहे.

ए, बी आणि एबी अशा चार प्रकारांमध्ये मानवी रक्तगट विभागलेले असतात. या रक्त गटांमध्ये आरएच पॉझिटिव्ह आणि आर एच निगेटिव्ह या दोन प्रकारांमध्ये प्रथिने अस्तित्वात असतात. यामुळे या चार मूळ रक्तगटांचे आर एच फॅक्टर नुसार वर्गीकरण होऊन आठ प्रकारांमध्ये विभाजन होते.आर एच प्रकारानुसार तुमच्या इम्युन सिस्टम वर प्रभाव टाकणारे अँन्टीबाँडीज तयार होत असतात.

तुमच्या रक्तातील आर एच फॅक्टर हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे यानुसार गर्भावस्थेमध्ये काही गुंतागुंतीच्या समस्या क्वचित निर्माण होऊ शकतात .जर मातेचा रक्तगट आर एच निगेटिव्ह असेल आणि गर्भाचा आळ एच पॉझिटिव्ह असेल तर मातेच्या रक्त गटाकडून तयार होणाऱ्या अँटीबॉडी गर्भातील आरएच पॉझिटिव्ह लाल रक्त पेशींवर प्रतिबंधात्मक  हल्ला करू शकतात अशा वेळी गर्भावस्थेमध्ये जास्त काळजी घेणे आवश्यक ठरते.

मातेचा आर एच फॅक्टर निगेटिव्ह असेल तर अशावेळी डॉक्टर्स कडून सातव्या महिन्यामध्ये मातेच्या रक्तामध्ये गर्भाच्या लाल रक्त पेशींवर हल्ला करणाऱ्या अँटीबॉडीज तयार होऊ नये यासाठी काही उपचार केले जातात व प्रसुतीनंतर लगेचच बाळाचा रक्तगट आर एच पॉझिटिव्ह आहे ना हे पुन्हा एकदा निश्चित केले जाते.