भारतामध्ये खानपानासोबतच निरनिराळी पेय सुद्धा प्रसिद्ध आहेत. चहा हे भारतातील अतिशय लोकप्रिय पेय आहे. चहाच्या बरोबरीनेच सध्याच्या काळात तरुणवर्ग आणि सोबतच निरनिराळ्या वयोगटामध्ये कॉफी पिण्याचेही प्रमाण वाढले आहे. या अनुषंगाने कॅफे कॉफी डे ,स्टारबक्स यांसारख्या कॉफी साठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांची निर्मिती झाली .भारतासाठी भूषण मानले जाणारे व जागतिक स्तरावरही ज्याविषयी उत्सुकता आहे असे हॉटेल ताजमध्ये चहाचा दर नेमका किती आहे याविषयी अनेक प्रश्न विचारले जातात व त्यावरून चर्चाही झडतात. मात्र आजच्या लेखात आपण हॉटेल ताजमध्ये कॉफी चे दर किती आहेत हे जाणून घेणार आहोत.
हॉटेल ताजमध्ये कॉफीची किंमत त्याच्या प्रकारानुसार निरनिराळी असते. कॅफे कॅपिचीनो ची किंमत 635 रुपये असून काही कॉफींची किंमत साडेसातशे रुपये आहे.
हॉटेल ताज मध्ये कॉफी तीन ठिकाणी उपलब्ध आहे.शामियाना लॉन्ज, अपोलो लाँन्ज आणि सी लाँन्ज.या ठिकाणी कॉफी वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे. यापैकी शामियाना लाँन्ज आणि अपोलो लाँन्ज तळमजल्यावर आहे.
सी लाँन्जमध्ये प्रवेश घेण्यासाठी फॉर्मल पेहराव असणे आवश्यक असते व याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. पादत्राणांचे उदाहरण घ्यायचे झाले तर चप्पल घालून तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. याठिकाणी फॉर्मल शूज किंवा बूट घालून प्रवेश घेतला जाऊ शकतो.
भारतातील पंचतारांकित हॉटेल्स मध्ये अग्रमानांकन लाभलेले ताज हॉटेलमध्ये फक्त कॉफी घेण्यासाठी अल्पोपहार घेण्यासाठी आपण जाऊ शकतो. यासाठी त्या ठिकाणी मुक्काम करण्यासाठी रुम बुक करण्याची कोणतीही आवश्यकता नसते.